पंतप्रधान आवास योजनेला पुण्यात प्रतिसादच मिळेना

लाभार्थींचा प्रतिसाद नसल्याने आता प्रथम येईल त्याला घर देणार

पुणे – पंतप्रधान आवास योजनेत महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात 2,918 सदनिका बांधण्यात येणार आहेत. मात्र, या सदनिका घेण्यासाठी लॉटरी काढून महापालिकेने तब्बल 6 हजार जणांना घरे घेण्याची संधी दिली. मात्र, त्यातील अवघ्या 1,200 जणांनीच घर घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम भरलेली आहे. त्यामुळे महापालिकेने या नागरिकांसाठी तिसऱ्यांदा जाहिरात काढली आहे. या 6 लाभार्थींमध्ये प्रथम येईल, त्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

 

 

महापालिकेने शहरातील नागरिकांना परवडणारे घर देण्यासाठी खराडी, हडपसर व वडगाव येथे 2,918 घरांचे पाच प्रकल्प राबवले आहेत. या प्रकल्पांमधील घरांसाठी 20 हजार नागरिकांनी नोंदणी केली.

 

 

त्यामुळे घरांचे वाटप करण्यासाठी महापालिकेने 24 ऑक्टोबर 2020 रोजी घरांची ऑलनाइन सोडत काढण्यात आली. यातून पात्र आणि प्रतिक्षायादी निवडण्यात आली होती. ऑनलाइन सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या नागरिकांना 12 लाख रुपयांमध्ये घर मिळणार आहे.

 

 

यासाठी 10 टक्के रक्कन भरावी लागणार होती. यासाठी महापालिका प्रशासनाने 30 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र, घरे लागलेल्या पहिल्या यादीत केवळ 700 जणांनीच घर घेण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर पालिकेने प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी दिली. मात्र, त्यातही केवळ 500 जणांनीच घर घेण्यासाठी आवश्यक रक्कम भरली. त्यामुळे मूळ लाभार्थी आणि प्रतीक्षा यादीतील नागरिकांनाही संधी देऊन ते आलेले नाहीत. त्यामुळे तिसऱ्यांदा जाहिरात काढून या दोन्ही यादींमधील जे नागरिक घर मागतील, त्यांना ते देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.