आजचे भविष्य (मंगळवार, दि.१९ जानेवारी २०२१)

मेष : नवीन नोकरीच्या कामात थोडा विलंब सहन करावा लागेल. स्वतःचा छंद जोपासावा.

वृषभ : आप्तेष्टांचा सहवास लाभेल. वैचारिक मतभेद होतील तरी डोके शांत ठेवा. दगदग, धावपळ कमी करावी.

मिथुन : मानसिक आनंद मिळवून देणारे ग्रहमान आहे. अडीअडचणींवर मात करून कामात प्रगती कराल.

कर्क : नवीन आखलेले बेत सफल होतील. आर्थिक स्थितीही सुधारेल. नोकरीत तुमच्या सूचनांचा विचार करतील.

सिंह : मान व प्रतिष्ठा मिळवून देतील. आवश्‍यक ती कामे ओळखीचा उपयोग होऊन होतील.

कन्या : घरात वातावरणात चांगला बदल घडेल. मनोकामना सफल होतील. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल.

तूळ : व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ चांगल्या स्वरुपात तुम्हाला मिळेल. पाहुण्यांची ये-जा राहील.

वृश्‍चिक : तुमचे प्रयत्न व कष्ट यांची योग्य सांगड घालतील तर यश फार दूर नाही असा अनुभव येईल.

धनु : व्यवसायात योग्य नियोजनाने कामे होतील. पैशामुळे हितसंबंध दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या.

मकर : नोकरीत हाताखालच्या व्यक्‍तींकडून काम कसे करून घेता यावर यशाची भिस्त राहील.

कुंभ : मध्यस्थांवर सोपवलेल्या कामावर देखरेख ठेवा. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा अधिकार व सवलतही देतील.

मीन : घरात किरकोळ मानापमानाचे प्रसंग उठतील. शांत रहा. दगदग, धावपळ कमी करा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.