मुंबई – साऊथची स्टार रश्मिका मंदान्ना ‘नॅशनल क्रश’ आहे. ‘पुष्पा : द राइज’नंतर रश्मिका घराघरात प्रसिद्ध झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर रश्मिकाची फॅन फॉलोइंग ज्या वेगाने वाढली आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. अलीकडेच, रश्मिका मंदान्ना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी अभिनेत्रीने जीन्ससह एक साधा विणलेला टॉप परिधान केला होता, प्रत्येक वेळी अभिनेत्रीने तिच्या हसण्याने आणि लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र, यावेळी रश्मिकाचा आउटफिट अगदी साधा होता, पण तिच्या टॉपची किंमत ऐकून सर्वांचा धक्का बसला आहे.
यावेळी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आंतरराष्ट्रीय ब्रँड डोल्से अँड गब्बानाचा टॉप परिधान केला होता, ज्याची किंमत 2,05,881 रुपये आहे. रश्मिकाच्या या टॉपने लोकांचं लक्ष वेधून घेतलं नाही, पण त्याची किंमत ऐकल्यानंतर तुम्हाला तो चारचौघात नक्कीच दिसेल.
लेसिंग एलिमेंट्स, पूर्ण स्लीव्हज आणि ब्रॉड नेक टॉपमध्ये दिसत आहे. रश्मिकाने रिप्ड डेनिम जीन्ससोबत हा टॉप कॅरी होता. तसेच, तिने त्यावर बेल्ट घातला असून आपला लुक पूर्ण केला. यावेळी ती अतिशय बोल्ड आणि ग्लॅमर्स दिसत होती. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
रश्मिका मंदान्ना शेवटची ‘मिशन मजनू’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि थलपथी विजय स्टारर ‘वारीसू’ सोबत दिसली होती. अभिनेत्री लवकरच अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार आहे, ज्याचे शूटिंग ती लवकरच सुरू करणार आहे. याशिवाय, अभिनेत्री नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयाबाहेर स्पॉट झाली होती.