देशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर

देशात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील विविध राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी त्यांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसते आहे.

उत्तर प्रदेशातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बदायूँ जिल्ह्यात एका अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाऊन असतानाही लोकांनी गर्दी केली आहे.

व्हिडिओ पाहून बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने संताप व्यक्‍त केला आहे. स्वराने एक ट्‌विट रिट्‌विट केलं आहे. या देशात मूर्ख लोकांची कमी नाही, असे ट्‌विट करत स्वराने संताप व्यक्‍त केला आहे.

स्वरा भास्कर राजकीय भूमिका घेऊन तिची मते मांडत असते. अनेकवेळा ती वादग्रस्त वक्‍तव्यांमुळे चर्चेत असते. स्वराने केलेले हे ट्‌विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

तिच्या राजकीय कॉमेंटचा रोख यापूर्वी कायमच पंतप्रधान मोदींच्या विरोधात असायचा. त्यामुळे तिची मानसिकता हिंदूविरोधी मानली जात असे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.