आता… ‘राखी सावंत’ देखील जाणार हॉलीवूडमध्ये

“ड्रामा क्‍वीन’ राखी सावंत सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. ती नेहमीच स्वतःचे फोटो, व्हिडीओ अपलोड करत असते. तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती हॉलीवूडमधील ऍक्‍ट्रेसच्या गेटअपमध्ये दिसते आहे. आपण लवकरच हॉलीवूडमध्ये जाणार असल्याचे राखीने या व्हिडीओतून सांगितले आहे.

इन्स्टाग्रामवरचा तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नीट बघितल्यावर राखीची ड्रामेबाजी लक्षात येते. हॉलीवूडमधील गाजलेल्या ऍक्‍ट्रेसने साकारलेल्या रोलच्या व्हिडीओमध्ये राखीने स्वतःचा चेहरा डीपफेक ऍनिमेट केला आहे.

तिचा हा व्हिडीओ बघितल्यावर तिचे फॅन्स तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करायला लागले आहेत. एकाने तर राखीने खरोखर हॉलीवूडमध्ये जायला पाहिजे. कारण राखीचा चेहरा हॉलीवूडला अगदी साजेसा असाच आहे, अशी कॉमेंट केली आहे. एकाने तिला अगदी डोक्‍यावर घेऊन नाचण्याएवढे कौतुक केले आहे.

राखी नेहमीच फेसऍप आणि रिफेस व्हिडीओ करून ते शेअर करत असते. तिने यापूर्वीही हॉलीवूडमधील कलाकारांच्या रोलमध्ये स्वतःचा चेहरा वापरून ते व्हिडीओ शेअर केले होते.

जर मी हॉलीवूडमध्ये काम केले, तर कसे वाटेल ? असा प्रश्‍नही तिने आपल्या फॅन्सना विचारला होता. तिचा हा व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.