नवी दिल्ली – केंद्र सरकार, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात कोणतीही कपात करणार नाही. करोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार अशा प्रकारच्या हालचालींची योजना आखत असल्याचा अंदाज वर्तविणाऱ्या सोशल मिडीयावरील वृत्तात कोनतेही तथ्य नसल्याचे पत्र सूचना कार्यालयाने ट्विटमध्ये उघड केले आहे.
“पीआयबी’ने फेसबुकवरील आणखी एक अफवा उघडकीस आणली आहे. त्यात आयसीएमआरने स्वस्त दराचा पर्याय उपलब्ध असताना जास्त किमतीला “कोविड-19′ चाचणी किट खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता.”आयसीएमआर’ने स्पष्टीकरण दिले की त्यांच्याकडे किट्सचे दर निश्चित आहेत आणि कोणत्याही कंपनीला त्याहून स्वस्तात ही किट्स उपलब्ध करून देता येत असतील तर त्यांच्यासमोर पर्याय खुला आहे.
काही पत्रकार मंडळी खोट्या बातम्या देण्यात आघाडीवर आहेत, अशा खोट्या पत्रकार म्हणवणाऱ्या लोकांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.