नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोदी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार आहे. त्या अगोदर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला आहे. कोरोनाविरोधातील लढाईत सर्व भारतीय एकत्र आहेत, यापेक्षा मोठी देशभक्ती नाही, असे सोनिया गांधींनी सांगितले.
कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी का देश के नाम संदेश:-
कोरोना संकट में डॉक्टर्स, सफाईकर्मियों, पुलिस सहित सरकारी अधिकारियों के डटे रहने से बड़ी “देशभक्ति” कोई नहीं है। हम एकता, अनुशासन और आत्मबल के भाव से कोरोना को परास्त करेंगे। धैर्य एवं संयम के लिए देशवासियों का धन्यवाद। pic.twitter.com/Sl4zkKURTv— Congress (@INCIndia) April 14, 2020
सोनिया गांधी यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटात तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरक्षित असाल. या संकटाच्या वेळी शांती, धैर्य आणि संयम राखणाऱ्या सर्व देशवासियांचे मनापासून आभार मानते. तुम्ही सर्व जण लॉकडाऊनच्या नियमांचे पूर्णपणे पालन करत असला अशी आशा मी बाळगते. सर्व जण घरामध्येच रहा, वेळोवेळी आपले हात धुवा, गरज असेल तरच घराबाहेर पडा, यावेळी मास्कचा वापर करा. तसंच, या कोरोनाविरोधातील लढाईत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सोनिया गांधींनी केले आहे.