बॉलीवूडच्या नवोदित कलाकारांमधील अफेअर्सबाबत “कल हो न हो’ अशी स्थिती असते. कधी आणि कोणत्या क्षणी या प्रेमीयुगुलांमध्ये ठिणगी पडेल आणि गाडी ब्रेकअपच्या वळणावर जाईल याचा नेम नसतो.
अर्थात, हे केवळ हिंदी सिनेसृष्टीतच घडते असं नाही तर आपल्या अवतीभवतीही घडतं. दाक्षिणात्य सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. दक्षिणेतील लोकप्रिय सुपरस्टार प्रभास आणि अनुष्काचेच घ्या ना !
View this post on Instagram
#5YearsForTrendsettingMirchi ???Thank u Deepak for this Wonderful Edit?Loved it ❤️
“बाहुबली’ या चित्रपटामुळे देशभरातील सिनेरसिकांच्या ओळखीचा झालेला प्रभास हल्ली सातत्याने चर्चेत असतो. कारण कित्येकदा त्याचे पर्सनल लाईफही असते. मध्यंतरी तो आपली सहनायिका अनुष्का शेट्टीसोबत डेट करत होता. या दोघांच्या जोडीला स्क्रिनवर प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
ऑफस्क्रिनही त्यांचं नातं “मस्त चाललंय आमचं’ असं सुरू होतं. इतकंच नव्हे तर दोघंही लवकरच लग्न करतील अशा चर्चा सुरू होत्या. पण दोघांनाही त्यांच्यातील नात्याविषयी विचारलं की अफवा आहेत असं सांगत असत.
आम्ही दोघं केवळ मित्र आहोत, असं नेहमी दिलं जाणारं उत्तर देत असत. पण आता खबर अशी आहे की, हे दोघेही एकमेकांना डेट करत नाहीत. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे जात आहेत.
View this post on Instagram
Hello darlings… A surprise coming your way, tomorrow. Stay tuned… #SaahoSurprise
इतकंच नव्हे तर अशीही चर्चा आहे की, अनुष्का सध्या एका भारतीय क्रिकेटपटूला डेट करत आहे ! त्यांच्यात नेमकं काय बिनसलं असेल याचे तर्कवितर्क आता सुरू आहेत!
View this post on Instagram