नाशिक – प्रेम प्रकरणातून मुलगी आणि तिच्या घरच्यांनी एका युवकाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील देवळा तालुक्यात लोहणेर घडली आहे.
याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, संबंधित मुलीसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पीडित युवक 55 टक्के भाजला असून त्याच्यावर देवळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गोरख काशीनाथ बच्छाव असे पीडित तरुणाचे नाव आहे. देवळा पोलिसांनी संबंधित मुलगी, तिचे आई वडिल आणि दोन भाऊ यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. पीडित मुलाचे आणि आरोपी मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणाने दोघांचे ब्रेक अप झाले त्यानंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र ते मोडले. ते या युवकामुळेच मोडले असा पीडितेला संशय होता. याच रागातून पीडित तरुणावर हल्ला करण्यात आला. दोघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते.