हडपसर – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी आहे. राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण व समाज प्रबोधनाचे काम केले. आज आपल्याला अनेक सोई-सुविधा, सवलती उपलब्ध आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन आपण समाज प्रबोधनाचे काम केले पाहिजे. असे मत नगरसेवक व महापालिका शिक्षण समितीचे सदस्य मारुतीआबा तुपे यांनी व्यक्त केले.
पालिका व नगरसेवक मारुतीआबा तुपे यांच्या संकल्पनेतून हडपसर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रीडांगणमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या शिक्षण प्रसारक,समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व अखंड भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ भोसले यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण महात्मा फुले
यांचे व्याही गेणुजी कृष्णाजी ससाणे यांचे नातु मारुती तुकाराम ससाणे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार वाघोबा तुपे यांचे वंशज विवेक तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक मारुतीआबा तुपे, जीवन जाधव ,अशोक तुपे ,उल्हास तुपे ,महेश ससाणे ,दिलीप तुपे ,शिवाजी तुपे ,योगेश ढोरे ,गोरख तुपे,हेमंत वाडकर ,मुकेश वाडकर ,ओंकार तुपे तसेच स्थानिक नागरिक व मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.