सणसवाडी (प्रतिधिनी): सणसवाडी, ता. शिरूर येथून महिला सयाबाई गणपत शिंदे दि. ६ रोजी सकाळी १० पासून बेपत्ता झाली होती. याबाबत हरवल्याची तक्रार शिक्रापुर पोलिसांत दिली होती. दोन दिवस शोध घेवूनही सापडून आली नव्हती.
दि. ८ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सणसवाडीतील स्मशानभुमी च्या बाजूला पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये एक महिला पाण्यात पडली असल्याचे विहीर मालक अनिल बबनराव दरेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गावचे पोलीस पाटील दत्ता माने यांना कळवले.
सदर महिलेला जिवंत स्थितीत पाण्यातून बाहेर सुखरूप काढण्यासाठी सर्पमित्र बाळासाहेब मोरे व अनिल दरेकर, विकास हरगुडे तसेच जय मल्हार तरुण मंडळ कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले. सदर महिलेला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असून स्थिती उत्तम असल्याचे सांगण्यात आले. महिलेला त्यांच्या परिवाराच्या ताब्यात देण्यात आले.