मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने देशभर चांगलाच धुमाकूळ घातला. गरीब पण ऍटिट्यूड असलेला पुष्पा सर्वांनाच खूप आवडला. परिस्थितीने केलेला अन्याय आणि इनलिगल व्यवसाय करणारा पुष्पा पहिल्या पार्टमधे सर्वांसाठी हिरो होता. अभिनेत्री रश्मीका मंदनाने देखील या चित्रपटात अल्लूसोबत दमदार भूमिका साकारली होती.
लाल चंदनाचा व्यवसाय करणाऱ्या पुष्पा आणि त्याला अडवणाऱ्या भवर सिंहची गोष्ट आता पुढे सरकारणार आहे. पहिल्या पार्टच्या शेवटीच याचा दुसरा पार्ट येणार असल्याचे स्पष्ट झाले असून, ‘पुष्पा 2 द रुल’ बद्दल सिनेरसिक चांगलेच उत्सुक आहेत. अश्यातच पुष्पाच्या दुसऱ्या पार्टबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे, जे चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणार आहे.
3 minute clip releasing on 8th April. The video will describe the plot/concept around which #Pushpa2 is made. Easily one of the most hyped films. pic.twitter.com/ggq0G591Pd
— Nishit Shaw (@NishitShawHere) March 20, 2023
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाचे निर्माते 8 एप्रिल रोजी म्हणजेच अभिनेता अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या फ्रेंचायझीच्या दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज करण्यासाठी सज्ज आहेत. निर्माते चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता चाहते देखील भलतेच खुश झाले आहेत.
दरम्यान, ‘पुष्पा’ चित्रपटाने फक्त देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. त्याने या भूमिकेसाठी अफाट मेहनत घेतली होती. त्याला पहिल्यांदा या रुपात पाहून चाहते थक्क झाले होते. त्याची स्टाईल आणि ऍटिट्यूड पाहून सगळेच त्याचे फॅन्स झाले होते.