रांजणगाव गणपती (पुणे)- शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील एका ज्येष्ठ नागरिकाचा करोना आजाराने मृत्यू झाला. अशी माहिती रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेवार यांनी दिली.
या रुग्णास उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या व्यक्तीला सुरुवातीला त्रास सुरू झाल्यावर मलठण येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले. मात्र अधिक त्रास होऊ लागल्यावर पुण्यात ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.