पुणे- एकाच महिलेच्या प्रेमात पडलेल्या दोघांनी संबंधीत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार हडपसर येथील एका कंपनीत घडला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात जे डिसोजा व राजेश पोगट यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हडपसर येथील एसपी इंन्फोसीटी नावाच्या इमारतीतील एका कार्यालयात घडली.
एका तीस वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार ती काम करत असलेल्या कंपनीतील जे डिसोजा नावाच्या सहकाऱ्याने तीला लंच टाईममध्ये जेवण्यासाठी बोलवले होते. जेवल्यानंतर ती हात धुत असताना तीला धक्का देऊन छातीस स्पर्श करुन “तु मला खुप आवडतेस’ असे म्हणत विनयभंग केला. ही घटना तीने सावरल्यानंतर काही दिवसांनी दुसरा सहकारी राजेश पोंगट याच्या कानावर घातली. यावेळी त्याने फिर्यादी महिलेस “कॉमन बात है, मै भी आप मे इंटरेस्ट रखता हू’ म्हणत मनाज लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक क्षिरसागर करत आहेत.