पुणे -शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी तापमान चाळीस अंश सेल्सियसजवळ गेल्याचे नोंदवले गेले. हंगामात पहिल्यांदाच पाऱ्याने काही ठिकाणी 36 ते 39 अंशांपर्यंत उसळी घेतली. तर, सायंकाळच्या सुमारास मात्र हलक्या पावसाने वातावरणात गारवा पसरला. दरम्यान, शहर परिसरात दिवसभरात सरासरी 36.6 अंश सेल्सि. तापमान नोंदवले गेले.
राज्यात मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार बदल जाणवत आहेत. तर, आता पुन्हा एकदा राज्यात 5 ते 7 एप्रिलदरम्यान पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सातारा आणि कोल्हापुरात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, हवेली- 36.5, चिंचवड- 38.9, शिरुर- 39.8, राजगुरूनगर-39.2, वडगाव शेरी- 38.5, पाषाण- 36.7, शिवाजीनगर- 36.6, हडपसर-37.5, बारामती-36.5 अंश सेल्सियस या प्रमाणे नोंद झाली.