अकलूज – सध्या लवकरच शाळा सुरू होणार असे वेध सर्वांना लागले आहेत. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. म्हणून खंडाळी येथील कलाशिक्षकाने जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यात अभ्यासवर्ग सुरु केला आहे. दि. ५ सप्टेंबर पासून अभ्यासाचा ध्यास अन कोरोनाचा ऱ्हास या प्रमाणे येथील शरद भोसले यांनी सुरू केलेल्या अभ्यासवर्गात सध्या 60 विद्यार्थी धडे गिरवताहेत.
शरद भोसले यांनी जि.प. प्रा. शाळा भोसलेवस्ती येथे ५ सप्टेंबरला शिक्षक दिनापासून अभ्यास वर्ग सुरू केला असुन अंगणवाडी ते १०वीपर्यंतचे ६०हुन अधिक विद्यार्थी अभ्यास वर्गाला उपस्थित असतात.
एका शाळेत गुरुजींनी लढवलेली शक्कल पाहून सर्वांनाच कौतुक वाटतंय. कारण, विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करुन या शाळेत धडे दिले जात आहेत.
नेहमीच वर्गात भरणारी शाळा, कोरोनामुळे वर्गाबाहेर भरविण्यात आली असून बाहेरील भींतीवरच फळा बनविण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा फळा असून सोशल डिस्टन्स पाळून हा अभ्यासवर्ग सुरू आहे. या शाळेत अंगणवाडी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठं शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांना अ या अक्षरांचीही ओळख नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून व्हरांड्यातच मोफत अभ्यासवर्ग सुरू केला आहे.
– शरद भोसले, कलाशिक्षक