मुंबई – रणवीर सिंह लीड रोलमध्ये असलेला “83′ सर्वात पहिल्यांदा थिएटरलाच रिलीज होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो पहिल्यांदा रिलीज केला जाणार नाही. सध्या सगळे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज केले जात असल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना ते सहज बघता येऊ शकत नाहीत.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे इतर अन्य सिनेमांप्रमाणे “83’चे रिलीजदेखील तुर्तास स्थगित करून ठेवले गेले आहे. आणखीन काही दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन मगच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे “83’चे दिग्दर्शक कबीर खाननी इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ’83’च्या मेकर्सनी आता मल्टिप्लेक्स मालकांसमोर 4 मोठ्या अटी ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे, या अटी पाहून मल्टिप्लेक्स मालकांचे डोळे चक्रावले आहेत.
या आहेत त्या विशेष अटी…
१) थिएटर मालकांनी व्हर्च्युअल प्रिंट फी घेऊ नये, ही ’83’च्या मेकर्सची पहिली अट आहे. प्रत्येक स्क्रिनच्या हिशेबाने थिएटर मालक निर्मात्यांकडून सुमारे 20 हजार रूपये फी आकारतात. मात्र, यंदा त्यांना ही फी आकारतात येणार नाही. त्यामुळे ती रद्द करावी, अशी अट निर्मात्यांनी ठेवली आहे.
२) सिनेमाच्या मेकर्सची दुसरी अट अशी ठेवली आहे कि, ’83’ हा एक अतिशय महागडा सिनेमा आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे, कि अधिकाधिक स्क्रिन्सवर ’83’ हाच सिनेमा दाखवावा असे मेकर्सचे म्हणणे आहे.
३) सध्या नियमानुसार कोणताही सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाल्यानंतर 8 आठवडे ओटीटीवर रिलीज केला जाऊ शकत नाही. ‘83’च्या मेकर्सनी मात्र 4 आठवड्यानंतर ओटीटी प्रदर्शनाची परवानगी मिळावी, अशी अट ठवेली आहे.
४) रिलीज झाल्यानंतर पहिल्या 2 आठवड्यांत प्रेक्षक न मिळाल्यास ‘83’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याची लेखी परवानगी द्यावी, अशी मेकर्सची चौथी अट आहे.
दिग्गज क्रिकेट पट्टू कपिल देव यांच्या ऐतिहासिक कामगिरीला “83’द्वारे पुन्हा एकदा जिवंत केले जाणार आहे आणि तत्कालिन कर्णधार कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंग करतो आहे. बऱ्याच दिवसांनी क्रिकेटवरील सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.