मुंबई – “बाहुबली’ डायरेक्टर एसएस राजामौली यांचा आगामी बिग बजेट असलेल्या “आरआरआर’ हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात असलेले स्टार कास्टमुळे चाहत्यांची उत्सुकता खूपच वाढलेली आहे. यात अभिनेता राम चरण, ज्यूनियर एनटीआर, अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट्ट यासारखे दिग्गज कलाकार काम करत आहे. दरम्यान, या चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘नाटू नाटू’ युक्रेनमध्येच चित्रित करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, जग तिसऱ्या महायुद्धात ढकललं जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेन हा भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी आवडता शूटिंग स्पॉट राहिला आहे. या ठिकाणी बऱ्याच भारतीय चित्रपटांचं शूटिंग झालं आहे.
मागच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये या युद्धभूमीवर राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याचं शूटिंग झालं होतं. या संदर्भातील काही व्हिडिओ सुद्धा राजामौली यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकले आहेत. या गाण्यात अभिनेता राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर यांचा तुफान डान्स दिसून येत आहे. हे गाणं अतिशय कमी कालावधीत सोशल मीडियावर जबरदस्त हिट झालं. ‘नाटू नाटू’ गाण्याच्या दरम्यान, तब्बल दोन आठवडे चित्रपटाची संपूर्ण टीम युक्रेनमध्ये राहिली होती.