पुणे(प्रतिनिधी): लॉकडाऊनच्या पाचव्या टप्यात केंद्र सरकारने उद्यापासून(8जून सोमवार) मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचे जाहीर केले असले तरी राज्य सरकारने मात्र मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देवदेवश्वर संस्थांनची सारसबाग मंदिरासह अन्य दोन मंदिरे बंदच राहणार आहेत.
मंदिरे सुरू करण्याबाबतचा आदेश हा केंद्र सरकारने दिला आहे पण राज्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता धार्मिक स्थळे सुरू करणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर उद्या (सोमवारी) असणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने भाविक सारसबाग मंदिरात गर्दी करत असतात पण मंदिर बंद असल्याने नागरिकांनी दर्शनासाठी येऊ नये. असे आवाहन करण्यात आले.
संस्थांनची सारसबाग व्यतिरिक्त दशभुजा गणपती आणि मृत्यंजय मंदिरे सुद्धा तीस जून पर्यत बंद राहणार आहेत. शासनाच्या पुढील आदेशानूसार जुलै महिन्यात मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे संस्थान चे विश्वस्त सुधीर पंडित यांनी कळविले आहे.