बंदर सेरी बेगवान : आधुनिक जगात श्रीमंत व्यक्तींची संख्या कमी नसली तरी अनेक श्रीमंतांना आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला आवडत नाही पण जगातील एका श्रीमंत सुलतानाला मात्र आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला आवडते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत सुलतान म्हणून शिक्का बसलेल्या ब्रूनेईच्या सुलतानांना आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करून लोकांवर छाप पाडायला आवडते या सुलतानाचे नाव हसन बोलकिया असे असून त्यांच्या संग्रहामध्ये तब्बल सात हजार आलिशान मोटारी आहेत.
या सुलतानाला सोन्याचाही प्रचंड हव्यास असून त्यांच्या संग्रहातील बहुतेक सगळ्या वस्तूंशी त्यांनी सोन्याचा संबंध जोडलेला आहे काही मोटारींमध्येही सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या सुलतानाचे सिंहासन असो किंवा मोटारीमधील आसने असो प्रत्येक ठिकाणी सोन्याचा मुबलक वापर करण्यात आला आहे. या सुलतानाच्या महालाची किंमत तब्बल अडीच हजार कोटी पेक्षा जास्त असून त्यामध्ये ही सोन्याचा भरपूर प्रमाणात वापर करण्यात आला आहे. या छोट्या देशावर पन्नास वर्षे राज्य करणारे सुलतान सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती मानली जाते 1980 पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणुन बहुमान त्यांच्याकडे होता त्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले सुलतान बोलकिया 75 वर्षांचे असून त्यांचे घराणे गेले सहाशे वर्षापासून या देशावर राज्य करत आहे.
सुलतानाकडे आलिशान मोटारी व्यतिरिक्त प्रायव्हेट जेट असून त्यामध्ये काही बोईंग विमानाचाही समावेश आहे तेल आणि नैसर्गिक वायू हे ब्रुनेई चे मुख्य उत्पन्नाचे साधन असून या सुलतानाकडे तब्बल 15 हजार कोटी रुपयांची वैयक्तिक संपत्ती असल्याचे सांगितले जाते. सुलतानाचा महाल तब्बल वीस लाख चौरस फुटाचा क्षेत्रामध्ये बांधण्यात आला आहे. महालाचे घुमट आहेत त्याच्यावर सोन्याचा पत्रा चढवलेला आहे.