लंडन – ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील काही महत्वाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. ब्रिटन सरकारमधील चॅन्सेलर ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. विल क्विन्स यांनीही आपल्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
ख्रिस पिंचर यांना उप मुख्य प्रतोद पदावर नियुक्त केले गेले होते. मात्र ती आपली चूक होती, असे जॉन्सन यांनी कबूल केले होते. त्यांची मनधरणी करायला गेलेल्या विल क्विन्स यांनीच आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला आहे.
त्यापूर्वी रॉबिन वॉकर यांनी शालेय शिक्षण मिंत्रपदाचा राजीनामा दिला आहे. चर्चच्या व्यापक भूमिकेला संकुचित केले जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. कोणत्याही कन्झर्वेटिव्ह सरकारने चर्चचे महत्व जपले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.
त्यापाठोपाठ टोरीच्या खासदार लॉरा ट्रॉट यांनी परिवहन विभागातील मत्री सहायक पदाचा राजीनामा दिला. सरकारने विस्वास गमावला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यामुळे राजीनामे देणाऱ्या मंत्र्यांच्या सहायकांचीही संख्या वाढली आहे. नाराज झालेल्या कनिष्ठ मंत्र्यांनी आणि सरकारी सहायकांनी एकापाठोपाठ एक करत आपल्या पदांचे राजीनामे दिल्यामुळे बोरीस जॉन्सन यांच्यापुढील नेतृत्वाचे आव्हान अधिकच बिकट झाले आहे.
राजीनामे दिलेले मंत्री
चॅन्सेलर ऋषी सुनक,
आरोग्य मंत्री साजिद जाविद
शिक्षण मंत्री विल क्विन्स
शालेय शिक्षण मंत्री रॉबिन वॉकर
खासदार लॉरा ट्रॉट