सातारा – जिल्ह्यात मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 207 नागरिकांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
तालुकानिहाय करोना बाधितांची संख्या व आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे- जावळी 2 (9952), कराड 24 (38839), खंडाळा 11 (14061), खटाव 20 (25456), कोरेगांव 14 (21753), माण 17 (17656), महाबळेश्वर 2 (4667), पाटण 2 (10084), फलटण 46 (36846), सातारा 64 (51090), वाई 3 (15655) व इतर 3 (2092) असे आजअखेर एकूण 248151 नागरिकांचे अहवाल करोना बाधित आले आहेत.
मंगळवारी कोरेगाव व वाई तालुक्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6084 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 264 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.