वाल्ह्यात पावसाने बाजरीच्या पिकाला तारले

वाल्हे – मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फायदा ऐन फुलोऱ्यात आलेल्या बाजरी पिकाला झाला आहे. त्यामुळे वाल्हे परिसरातील दौंडज, पिंगोरी, कवडेवाडी, आडाचीवाडी, हनुमानवस्ती, वरचामळा येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

यावर्षी खरीप पिकांच्या हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली होती. कामठवाडी, वागदरवाडी, भैरजीची वाडी, मोरूजीची वाडी, वडाची वाडी या परिसरातील खरीप हंगाम या वर्षी वाया गेल्याने येथील शेतकरी चिंतेत आहे. पुरंदरमधील पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे वागदरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वडाची वाडी व बाळाजीचीवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.