महसूलसोबत अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना “ड्यूटी’

विधानसभेसाठी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मिळणार चार सहाय्यक अधिकारी 

नगर – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा महसूल विभागासोबत अन्य शासकीय विभागाचे अधिकारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. पूर्वी मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एकच सहाय्यक निवडणूक अधिकारी मिळत होते. यंदाही संख्या अन्य जिल्ह्यात तीन असून नगर जिल्ह्यात काही मतदारसंघात ही संख्या चार राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना आणि निर्णय घेण्यात येत आहे. असाच एक महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. यात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा महसूल विभागासोबत अन्य शासकीय विभागाचे अधिकारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. पूर्वी मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एकच सहाय्यक निवडणूक अधिकारी मिळत होते.

यंदाही संख्या अन्य जिल्ह्यात तीन असून नगर जिल्ह्यात काही मतदारसंघात ही संख्या चार राहणार आहे. त्यानूसार अकोले मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अकोले, तालुका कृषी अधिकारी, मुख्य वित्त लेखाअधिकारी नगर पंचायत आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी. संगमनेर मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संगमनेर,गटविकास अधिकारी पंचायत समिती, मुख्य वित्त लेखाअधिकारी नगर पंचायत. शिर्डी मतदारसंघात तहसीलदार राहाता, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता, गटविकास अधिकारी पंचायत समिती. कोपरगाव मतदारसंघात तहसीलदार कोपरगाव,गटविकास अधिकारी कोपरगाव, सहय्यक गटविकास अधिकारी, मुख्य वित्त लेखाअधिकारी नगर पालिका.

श्रीरामपूर मतदारसंघ तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती, मुख्य वित्त लेखाअधिकारी नगर पालिका. नेवासा मतदारसंघात तहसीदार नेवासा, गटविकास अधिकारी पंचायत समिती, मुख्य वित्त लेखाअधिकारी नगर पंचायत. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात तहसीलदार शेवगाव, मुख्य वित्त लेखाअधिकारी नगर पंचायत शेवगाव, तालुका कृषी अधिकारी शेवगाव, तहसीलदार पाथर्डी.

राहुरी मतदारसंघात तहसीलदार राहुरी, मुख्य वित्त लेखाअधिकारी नगर पालिका, सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी. पारनेर मतदारसंघात तहसीलदार, मुख्य वित्त लेखाअधिकारी नगर पंचायत, उपअभियंता पाणी पुरवठा विभाग, उपनिबंधक सहकारी संस्था. नगर शहर मतदारसंघात तहसीलदार नगर, भूमी अभिलेख विभागाने डेप्युटी सुप्रीटेंडंट, तालुका कृषी अधिकारी आणि आत्माविभागाचे उपसंचालक. श्रीगोंदा मतदारसंघात तहसीलदार, गटविकास अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी आणि तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था वर्ग 2. कर्जत-जामखेड मतदारसंघात तहसीलदार कर्जत, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार कर्जत आणि तहसीलदार जामखेड यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)