पुणे- नेहमीच विविध हितकारक आणि लोकांना अपेक्षित असे काम करत असताना महाराष्ट्र मध्ये प्रसिध्द असलेले जनता दल (से) युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी कोरोनाच्या काळात एक पुस्तक लिहले होते. त्या पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम आज दिल्ली मध्ये देवेगौडा यांच्या निवासस्थानी पार पडला.
देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दल (से) राष्ट्रीय नेते एच.डी देवेगौडा देशाचे माजी पंतप्रधान व्ही.पी सिंग यांच्या पत्नी राणीसाहेब सितादेवी आणि संसद मधील बसपा पार्टीचे नेते खासदार कुंवर दानिश अली. व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला.
पुस्तक प्रकाशन वेळी देवेगौडा बोले नाथाभाऊ माझे कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांचा राजकिय प्रवास खूप संघर्षमय असून राज्यतील त्यांचे काम भरीव असून माजी ताकद कायम त्यांच्या सोबत आहे. तसेच खासदार दानिश अली बोले नाथाभाऊ माझे भाऊ असून खूप दिवसाचे त्यांचे आणि माझे सबंध आहेत.
त्यांचे पुस्तक प्रकाशन देवेगौडा साहेब यांच्या हस्ते पार पडला हा ऐतिहासिक क्षण आहे. नाथाभाऊ हे चळवळीतील नेते असून मी एक भाऊ म्हणून त्यांच्या सोबत कायम आहे. यावेळी सुशीला मोराळे, ललित रुनवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.