#budget 2021 : बजेटबाबत राज्य अर्थ मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘सबका साथ, सबका विकास, विश्वास’

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा आणखी एक वार्षिक अर्थसंकल्प संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सादर केला जाईल. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये देशाला करोना महामारीने जोरदार दणका दिला असल्याने या अर्थसंकल्पामध्ये काय असणार, याबाबत निश्‍चित सर्वसामान्यांना उत्सुकता आहे.

दरम्यान,  सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली आहे अर्थसंकल्प “कधी नव्हे इतका चांगला’ असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर  राज्य अर्थ मंत्री अनुराग  ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलतांना हा  अर्थसंकल्प सबका साथ, सबका विकास और विश्वास या तत्वावर  असणार आहे असे सांगितले आहे.  

ते पुढे मी म्हणाले,मोदी सरकारने महामारीच्यावेळी आत्मनिर्भर पैकेज सादर करून भारत देशाला नवी दिशा दिली आहे आणि अर्थव्यवस्थेला जलद मार्गावर  आणले आहे.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.