नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत. सरकारपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्व जण कोरोनाविरोधातील लढाईमध्ये पुढे सरसावले आहेत. अशातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी देखील कोरोनाविरोधातील लढाईत पुढाकार घेतला आहे. कारण गरिबांसाठी त्या स्वत: मास्क तयार करत आहेत.
Delhi: First Lady Savita Kovind stitched face masks at Shakti Haat in the President’s Estate. The masks stitched at Shakti Haat are being distributed at various shelter homes of Delhi Urban Shelter Improvement Board (22.04.2020) pic.twitter.com/CwtLvnqht6
— ANI (@ANI) April 22, 2020
सविता कोविंद यांनी कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी होत आपले योगदान दिले आहे. राष्ट्रपती इस्टेटमधील शक्ती हाटमध्ये मास्क तयार करत त्यांनी संदेश दिला आहे की, या संकटाच्या वेळी सर्वांनी एकमेकांना साथ देत कोरोनाला हरवू शकतो. मास्क तयार करत असताना सविता कोविंद यांनी स्वत: मास्क लावल्याचे पहायला मिळत आहे.
शक्ती हाट येथे तयार केलेले मास्क ‘दिल्ली अर्बन आश्रय सुधार बोर्ड’च्या वेगवेगळ्या निवारा गृहांमध्ये वितरित केले जातात. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. याआधी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियांनी मास्क तयार करत कोरोनाविरोधातील लढाईत योगदान दिले आहे.