नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पासपोर्ट जारी करण्याच्या पोलिस पडताळणीची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी एम पासपोर्ट हे पोलिस ऍप सुरू केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी पोलिसांच्या विशेष शाखेच्या कर्मचाऱ्यांना 350 मोबाईल टॅब्लेट समर्पित केले.
ही उपकरणे आता पोलीस पडताळणी आणि अहवाल सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यासाठी वापरली जातील असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने म्हटले आहे. टॅब्लेट वापरून पोलिस व्हेरीफिकेशनचा कालावधी आता पंधरा दिवसांवरून पाच दिवसांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रियाही वेगाने पार पडेल असा विश्वास सरकारी सूत्रांनी व्यक्त केला आहे.
शाह यांनी गुरुवारी हिंदीत ट्विट केले की, पासपोर्टच्या जलद पडताळणीसाठी पासपोर्ट मोबाइल ऍप्लिकेशन लॉन्च केले. डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे वेळेची बचत होईल तसेच पोलिस तपासात पारदर्शकता येईल.आज उचललेली ही पावले स्मार्ट पोलिसिंगसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.