सिडनी – मिशेल मार्शच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय लढतीत न्यूझीलंडचा 71 धावांनी पराभव करत विजय नोंदविला. मिशेल मार्श सामन्याचा मानकरी ठरला.
Claps instead of handshakes tonight at the SCG. Australia win the first Chappell-Hadlee ODI in Sydney by 71 runs. Scorecard | https://t.co/16tu1F1FiN #AUSvNZ pic.twitter.com/QW7VaLLiKd
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 13, 2020
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डेविड वाॅर्नरच्या 67(88), अॅरन फिंचच्या 60(75), मार्नस लबुशेनच्या 56(52) आणि मिशेल मार्शच्या 27(34) धावांच्या जोरावर 50 षटकांत 7 बाद 258 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून ईश सोढीने 3 तर मिशेल सॅटनर आणि लाॅकी फर्ग्युसनने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विजयासाठी 259 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 41 षटकांत 187 वर आटोपला. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने 40(73), टाॅम लाथमने 38(40) आणि काॅलिन डी ग्रैंडहोमने 25(26) धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिशेल मार्श आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 3 तर जोश हेझलवूड आणि एडम जम्पाने 2 गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
JUST IN: The ongoing #AUSvNZ ODI series and Australia’s upcoming away series in New Zealand have both been postponed amid growing COVID-19 concerns. pic.twitter.com/XNx29nwsdH
— ICC (@ICC) March 14, 2020
दरम्यान, चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंच्या धोक्यामुळे ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील उर्वरीत दोन सामने रद्द करण्यात आले आहेत. तसेच या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडला जाणार होता. मात्र, हा दौराही पुढे ढकलण्यात आला आहे.