- 24 तासांत चारशेहून अधिक नागरिक करोनाबाधित
- 28 मृत्यूंची नोंद
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली आहे. आज शहरातील बाधितांची संख्या पुन्हा चारशेच्या वर गेली आहे. शहरात आज नवीन 421 जणांना करोनाची लागण झाली. तर 28 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (दि. 3) शहरात 421 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 51 हजार 478 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 28 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 18 व शहराबाहेरील 10 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 6167 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 894 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 42 हजार 680 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6377 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 2777 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1903 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 4680 इतकी आहे.
मावळमध्ये करोना रुग्णसंख्येत वाढ
मावळ तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. 3) 79 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आज एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला असून, आतापर्यंत 441 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 776 आहे. शहरी भागात 29 तर ग्रामीण भागात 50 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत 18 रुग्ण सापडले. लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीत 8 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 3 रुग्ण सापडले. तालुक्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22,203 झाली आहे. तर दिवसभरात 83 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
गुरुवारी आढळलेल्या करोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 7, नवलाख उंब्रे, तुंग व वराळे प्रत्येकी 6, इंदोरी 4, देवघर, कान्हे, साळुंब्रे व सांगिसे प्रत्येकी 3, आंबळे, आंबी, भोयरे, कोळे चाफेसर, मोरवे, नाणे, निगडे, पांगळोली व तिकोणा प्रत्येकी 1 असे एकूण 50 रुग्ण मिळून आले. 20,986 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 441 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.