मुंबई : जगभरात कोरोनाचे 46 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या तीन लाखांवर गेली आहे. मागील 24 तासात 99,116 नवीन कोरोना रुग्ण समोर आले असून 24 तासात 5,050 लोकांचा मृत्यू झाला आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 308,642 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 17 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1,758,032 इतके कोरोनाबाधित बरे झाले आहेत.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 85,784 रुग्ण, तर 2,753 बळी कोरोनामुळे गेले आहेत. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,484,004 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 88,485 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 33,998 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 236,711 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,459 लोकांचा मृत्यू झालाय. 274,367 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 31,610 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 223,885 इतका आहे.