पुणे – कोरोनाव्हायरस संकटकाळादरम्यान देशभरात अनलॉक -5 सुरू असताना 15 ऑक्टोबरपासून सिनेमा थिएटर आणि मोठे मल्टीप्लेक्स पुन्हा उघडण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. या बातमीमुळे चित्रपटउद्योगासह सिनेरसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, चार ते पाच महिन्यापासून कोणताही चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालेला नाही. लॉकडाऊन मध्ये बहुतांश चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. अशावेळी चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, आता थिएटर्स सुरू झाल्यानंतर सर्वात आधी कोणता सिनेमा प्रदर्शित होईल?
15 ऑक्टोबरनंतर थिएटर उघडल्यानंतर काही चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. नुकतंच पुन्हा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे…
तान्हाजी : द अनसंग वॉरिअर –
शुभमंगल ज्यादा सावधान –
केदारनाथ –
मलंग –
थप्पड –