वाघोली – पुण्यातून अहमदनगर, बीड, नांदेड आदी ठिकाणी जाण्यासाठीचा मार्ग वाघोलीतून जातो. त्यामुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. दरम्यान, या वाहतूक कोंडीचा फटका आमदार अशोक पवार यांना बसला. आमदार पवार वाहतूक कोंडीत बराच वेळ अडकले होते.
शेवटी आमदार अशोक पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत कोली. सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनीदेखील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी नागरिकांना मदत केली.