चेन्नई – भारतीय नौदलाच्या जहाजाला शुक्रवारी पहाटे भारत-श्रीलंका आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ पाल्क सामुद्रधुनी येथे एक संशयास्पद बोट वावरताना आढळून आली आहे. या संशयास्पद बोटीतून त्या भागातील भारतीय मच्छीमारांवर गोळीबार करण्यात आला त्यात एक भारतीय मच्छीमार जखमी झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय नौदलाने या संशयास्पद बोटीला थांबण्याचा इशारा दिला.
पण ही बोट थांबली नाही त्यावेळी नौदलाने या बोटीच्या दिशेने गोळीबार केला. त्यात संशयास्पद बोटीवरील एक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय जखमी व्यक्तीवर प्रथमोपचार करण्यात आले आणि भारतीय नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरने रामनाद येथील परांडू येथे हलविण्यात आले आणि पुढील वैद्यकीय व्यवस्थापनासाठी त्याला रामनाथपुरमच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील दोन वर्षांच्या चिमुकलीवर भारतात यशस्वी शस्त्रक्रिया
त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे,” असे संरक्षण दलाने सांगितले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, पुढील तपशिलाची प्रतीक्षा आहे. पट्टाली मक्कल काचीचे संस्थापक डॉ. एस रामादोस यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोडियाक्कराई येथे मासेमारी करत असताना भारतीय नौदलाने केलेल्या गोळीबारात मच्छिमार जखमी झाला.