मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्मारकं आणि पुतळे उभारण्यावर खर्च केलेले जनतेचे सर्व पैसे परत करावेत असा आदेश बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जोरदार दणका दिला होता. दरम्यान, या आदेशावर मायावती यांनी आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून या प्रतिज्ञापत्रात स्मारकं आणि पुतळे उभारण्यावर खर्च करण्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रात मायावती यांनी नमूद केले आहे की, ”मी उभारलेली स्मारकं आणि पुतळे जनतेच्या इच्छा पूर्तीचे प्रतिनिधित्व करतात. हि स्मारकं आणि पुतळे उभारण्याबाबत त्यावेळी राज्य विधानसभेत पर्यायी चर्चा झाली होती. तसेच या स्मारकं आणि पुतळे उभारण्याबाबत बजेट देखील ठरविण्यात आले होते. लोकप्रतिनिधींद्वारे विधानसभेत घेतलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींबाबत निर्णयावर सर्वोच्च न्यायालय प्रश्न उपस्थित करू शकत नाही.”
BSP chief Mayawati files affidavit before the Supreme Court justifying expenses in installation of her statues and elephant statues in Uttar Pradesh. In her affidavit she has stated, ‘it was the will of the people’. (file pic) pic.twitter.com/eFAhTdwsqw
— ANI (@ANI) April 2, 2019