मुंबई – राज्यात करोनाच्या साथीमुळे पुडे ढकलण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमावारी दिली.आता या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होतील.
परीक्षांच्या काळात आलेल्या करोनाच्या साथीमुळे परीक्षा केंद्रावर येताना अडचणी निर्माण झाल्या असत्या. ीशवाय सर्वात महत्वाच मुद्दा या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा होता. अशातच अनेक विद्यार्थ्यांनाही ससर्ग झाल्याचे समोर आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यास पर्याय राहिला नव्हता, असे देशमुख यांन स्पिष्ट केले.
राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे 450 प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील 350 जण करोनाचा संसर्गने झाला आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच 19 एप्रिलला सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली होती.