‘टायटॅनिक’ची निर्माती कंपनीही बुडाली

बेलफास्ट (इंग्लंड) : “खुद्द परमेश्‍वराने मनात आणले तरी तो या जहाजाला बुडवू शकणार नाही…’ अशी दर्पोक्ती करत “आरएमएस टायटॅनिक’ नावाचे महाकाय, आलिशान आणि वेगवान जहाज निर्माण करणारी आयर्लंडमधील हार्लेंड ऍण्ड वोल्फ शिपयार्ड ही तब्बल 158 वर्षे जुनी कंपनीच आता बंद झाली आहे.

वर्ष 1861 मध्ये स्थापन झालेल्या या प्रतिष्ठेच्या जहाज बांधणी कंपनीमध्ये 100 वर्षांपूर्वी तब्बल 35 हजार कर्मचारी काम करत होते. मात्र ही कंपनी बंद झाली त्या दिवशी केवळ 130 कर्मचारी राहिले होते. या कर्मचाऱ्यांना कंपनीने सहा महिन्यांपूर्वीच कंपनी बंद होण्याबाबत नोटीसा दिल्या होत्या. त्यामुळे जहाज बांधणी क्षेत्रातील एक जुनी आणि अग्रगण्य कंपनी सागरतळाशी विसावा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

“टायटॅनिक’ या महाकाय जहाजाची कथा सर्वांनाच माहिती आहे. या जहाजामुळे ही कंपनी चर्चेत आली होती. “कधीही न बुडणारे जहाज’ अशी या जहाजाची ओळख करुन देण्यात आली होती. मात्र, इंग्लंडमधील साऊदप्टन बंदरातून अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या दिशेने निघालेले हे जहाज पहिल्याच प्रवासात हिमनगाला आदळल्याने, प्रवासाला निघाल्यापासून अवघ्या चारच दिवसांत, 12 एप्रिल 2011 रोजी बुडाले होते आणि 1517 जणांना जलसमाधी मिळाली होती. हे जहाज 31 मार्च 1912 मध्ये लॉंच करण्यात आले होते. या जहाजाची बांधणी लिव्हरपूलजवळ बेलफास्टमध्ये 1909 ते 1911 या काळात झाली होती. या कंपनीने दुसऱ्या महायुद्धावेळी जवळपास 150 पेक्षा जास्त युद्धनौका बनविल्या होत्या. वर्ष 1945 पासून कंपनी जहाज निर्मितीपासून लांब गेली. बंद होण्याच्या काळात ही कंपनी जलविद्युत आणि समुद्री इंजिनीअरिंगवर काम करत होती.

हार्लेंड ऍण्ड वोल्फ निर्मित जहाजे
1. आरएमएस ऑलिम्पिक – 1911
2. आरएमएस टायटॅनिक – 1912
3. आरएमएस ब्रिटानिक – 1914
4. एचएमएस बेलफास्ट – 1939 (युद्धनौका)
5. एस एस सदर्न क्रॉस – 1958

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here