मुंबई – लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ तिच्या बॉयफ्रेंड ‘सूरज नाम्बियार’सोबत नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. गोव्यात मौनी रॉय आणि सूरज नाम्बियारचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं होत. सकाळी दोघांनी मल्याळी रितीरिवाजांनुसार लग्न केले. यानंतर रात्री या कपलने बंगाली रितीरिवाजानुसार सुद्धा लग्न केलं.
दरम्यान, दोघांचा रोमँटिक अंदाजातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दोघांच्याही या व्हायरल झालेल्या व्हिडीओकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ मौनी आणि सूरज यांच्या लग्नाच्या पार्टीतला आहे. लग्नात मौनीने फुल पार्टी सेलिब्रेट केली होती. स्वतः मौनी हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून, “माय बंच ऑफ फूल्स’ असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
हा एक रोमँटिक व्हिडिओ असून, या व्हिडीओमध्ये मौनी रॉय पती सूरज नांबियार सोबत रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. दोघांनीही सर्वांसमोर लिपलॉक किस केले असल्याचे पाहायला मिळाले. सध्या या व्हिडिओवर फॅन्सने लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच, अनेकांनी या नवीन जोडीला लग्नाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.