‘द लायन किंग’ने केली आतापर्यंत एवढ्या कोटींची कमाई

1994 मधील ऍनिमेटेडपट ‘द लायन किंग’चा रिमेक असलेला “द लायन किंग” चित्रपट काही दिवसांपूर्वीच सिनेरसिकांच्या भेटीला आला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणाऱ्या छाव्याची कहाणी या चित्रपटात दाखवली गेली आहे.

दरम्यान, द लायन किंग चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत उतरला आहे. चित्रपटाने रिलीज नंतर पहिल्याच दिवशी जोरदार कमाई केली असून, चित्रपटाने आतापर्यंत तब्ब्ल 69.67 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘द लायन किंग’ चित्रपट भारतामध्ये हिंदीसह तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये 2140 स्क्रीन वर रिलीज करण्यात आला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.