पुणे – परंपरेनुसार यंदा देखील महापौरांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला असून, यानंतर पुण्यातील गणरायांच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे.
दरवर्षी पुण्याच्या महापौरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालण्यात येतो. त्यानंतर आरती होऊन विसर्जन मिरवणुकांना सुरुवात करण्यात येते.
यंदा परंपरेप्रमाणे मंडई चौकातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर महापौर कसबा गणपतीला हार घालणार असून, 11. 30 वाजता पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन होणार आहे.