नवी दिल्ली -आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav chadda) यांना मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) दिलासा दिला. त्यामुळे चढ्ढा तूर्त सरकारी बंगल्यात राहू शकणार आहेत.राघव चड्डा हे राज्यसभेत आम आदमी पार्टीचे (AAP) नेतृत्व करतात.राज्यसभेत निलंबन झाल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.
राज्यसभा (Member of Rajyasabha) सदस्य असणाऱ्या चढ्ढा यांना मागील वर्षी जुलैमध्ये टाईप 6 प्रकारचा सरकारी बंगला बहाल करण्यात आला. मात्र, त्यांनी नंतर टाईप 7 प्रकारच्या बंगल्याची मागणी केली.
चढ्ढा यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे मोठे सुरक्षापथक आधीच्या बंगल्यात सामावू शकत नाही, असे कारण त्या मागणीसाठी पुढे करण्यात आले. ती मागणी मान्य करत चढ्ढा यांना दुसरा बंगला उपलब्ध करण्यात आला.
मात्र, राज्यसभा सचिवालयाने चढ्ढा यांना बंगला सोडण्यास सांगितले. पहिल्यांदाच खासदार बनलेल्यांना टाईप 5 (Type 5 bunglo) बंगलाच दिला जातो, असे कारण देण्यात आले. त्यावरून चढ्ढा यांनी आधी स्थानिक न्यायालयात धाव घेतली. तिथे दिलासा न मिळाल्याने ते उच्च न्यायालयात गेले.