अहमदाबाद – कागद वाचवण्यासाठी गुजरात सरकारने सरकारी गॅझेटची छपाई करण्याची प्रथा आजपासून बंद केली आहे. आता येथून पुढे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच गॅझेट प्रकाशित केले जाणार आहे. या निर्णयामुळे सुमारे 35 मेट्रिक टन कागद वाचणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी टळणार आहे, असे गुजरात सरकारचे म्हणणे आहे.
हे गॅझेट म्हणजेच राजपत्र ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून दिले जाईल. ते विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. पण त्यासाठी नागरिकांची ओळख पटवण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. तसेच पुढील महिनाभरात गेल्या तीन वर्षांतील राजपत्र वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता ती सहज उपलब्ध होऊ शकतील, असेही सरकारने म्हटले आहे.