नवी दिल्ली – आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नसल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. नोकरदार वर्ग मागील पाच वर्षांपासून कर सवलत मिळेल अशी अपेक्षा करताना दिसत होता. मात्र सलग सहाव्या वर्षी आयकर जैसे थे!
आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. सलग सहाव्या वर्षी करात कोणतीही सवलत नाही. करचुकवेगिरी प्रकरणात सापडल्यास सगळी संपत्ती जप्त होणार त्यामुळे करचुकवेगिरी करणाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे.
इन्कम टॅक्स रिटर्नमधील सुसुत्रीकरणासाठी २ वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत कर सवलत देण्यात येणार येणार आहे. स्टार्टअपला सवलत देण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय. सेस हा खर्च म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प आहे.