आयर्नमॅन टॅलिन ही एस्टोनियामधील टॅलिन येथे आयोजित सर्वात अवघड शर्यतींपैकी एक आहे. ही शर्यत फुल आयर्नमॅन (3.8 किलोमीटर पोहणे, 180.2 किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर धावणे) आणि हाफ आयर्नमॅन 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग 21.1 किलोमीटर धावणे) अशा 2 प्रकारांमध्ये आयोजित केली जाते. या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत हजारो स्पर्धक सहभागी होतात. 31 वेळा फुल आयर्नमॅन मन ही स्पर्धा पुर्ण करणाऱ्या डॉ. कौस्तुभ राडकर यांनी स्थापन केलेल्या ‘रॅडस्ट्राँग कोचिंगच्या वतीने या वर्षी 26 खेळाडूंनी पूर्ण आयर्नमॅन आणि 7 खेळाडूंनी हाफ आयर्नमॅन पूर्ण करून मोठ्ठा इतिहास रचला आहे.
यंदाची आयर्नमॅन टॅलिनची स्पर्धा 6 ऑगस्ट रोजी पार पडली आणि परिस्थिती आव्हानात्मक होती. हार्कू तलावातील पाणी यावेळी 22 अंश गरम होते, परंतु आतील परिस्थिती अत्यंत खडबडीत होती ज्यामुळे खेळाडूंना विशेषतः पोहणे पूर्ण करताना पाहणे कठीण होते. सायकल लेगवर 4 तास मुसळधार पाऊस पडल्याने खेळाडूंसाठी एक वेगळे नवे आवाहन होते. त्यात भरीस भर म्हणजे 25 किमी प्रति तास वेग असलेले सोसाट्याचे वारे, 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत होते. धावण्याच्या शर्यतीत तापमान 25 अंशांवर गेल्यामुळे धावपटूंसमोर आणखी एक आव्हान होते.
रॅडस्ट्राँगतर्फे या वर्षी या शर्यतीमध्ये सामील होणाऱ्यांमध्ये 26 खेळाडूंपैकी रॅडस्ट्राँग संघात पूर्ण आयर्नमॅनसाठी 2 महिला फिनिशर आणि 24 पुरुष होते, हाफ आयर्नमॅनसाठी 7 पैकी 2 महिला होत्या.
युवा खेळाडूंमध्ये फ्लाइंग कलर्ससह चाचणी उत्तीर्ण होणारे 22 वर्षांचा योहान कुडतरकर आणि 24 वर्षांची ऋतुजा उडपीकर हे दोघे होते. याशिवाय एक पती-पत्नीची टीम देखील होती, त्यांच्यातील नूपूर बर्वेने हाफ आयर्नमॅन पूर्ण केली आणि तिचे पती मिहीर बर्वे यांनी फुल आयर्नमॅन पूर्ण केली. या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये संपत हरपळे हे 64 वर्षांचे सर्वात वयोवृद्ध स्पर्धक होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 100% श्रवणदोष असणाऱ्या आशुतोष सोमण यांनी 13 तासांत पूर्ण करून सर्वांना थक्क केले.
या वर्षी टीममध्ये युवा उद्योजक आणि यशस्वी व्यावसायिक श्री. कुणाल म्हस्के आणि श्री. शैलेश रांका यांच्यासह इतरही व्यावसायिक सहभागी झाले होते. ज्यामुळे हे कोचिंग खूप आव्हानात्मक होते. असे डॉ. कौस्तुभ राडकर मानतात.
रॅडस्ट्राँग संघाला तेथील भारतीय राजदूत श्री. अजनीश कुमार यांनी आपल्या घरी भारतीय जेवणासाठी आमंत्रित केले होते. याप्रसंगी संघाच्या वतीने आमचे प्रशिक्षक श्री. कौस्तुभ राडकर यांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीची चांदीची मूर्ती देऊन या राजदूत महोदयांचा सत्कार केला. सदर क्रीडा प्रकाराबद्दल जागरूकता वाढविणे, प्रसिद्धी करणे, भारतातील अधिकाधिक तरूण खेळाडुंचा या स्पर्धेत सहभाग वाढविणे या मुद्यांवरही विस्तृत चर्चा झाली.