बीजिंग – चीनच्या वायव्येकडील किंघाय प्रांतात आलेल्या पूरामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 36 जण बेपत्ता झाले आहेत. किंघाय प्रांतातील दातोंग हुई आणि तू या स्वायत्त प्रांतामध्ये बुधवारी रात्री हा मोठा पूर आला, असे चीनमधील शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने सरकारी आपत्कालिन यंत्रणेच्या हवाल्याने म्हटले आहे.
या पूराचा फटका 6 गावांमधील दिड हजार घरांमधील 6,245 रहिवाशांना या पूराचा फटका बसला आहे. दातोंग भागात आलेल्या मुसळधार पावसामुळे अचानक हा पूर आला आहे.
या अचानक आलेल्या पूरामुळे अधिकाऱ्यांनी दुसऱ्या श्रेणीचा आपत्कालिन इसारा जारी केला आहे. पूरग्रस्त भागांमध्ये 2 हजार सदस्यांचे मदत आणि बचाव पथक सक्रिय करण्यात आले आहे. अजूनही अनेक नागरिकांना पूराच्या पाण्यातून सोडवण्याचे काम सुरू आहे.
चीनमध्ये सध्या अत्यंत प्रतिकूल हवामानाची उदाहरणे बघायला मिळत आहेत. काही भागांमध्ये अतिवृष्टटीमुळे पूर आला आहे. तर काही भागात कमी पावसामुळे दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.