Maratha reservation – मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation ) मागणीसाठी हिंगाेली तालुक्यातील खंडाळा येथे तरुणाने तर बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील देवठाणा येथे एका अाॅटाेचालक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
हिंगाेली तालुक्यातील खंडाळा येथे तरुणाने मराठा आरक्षणासाठी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (९ डिसेंबर) उघडकीला आली आहे. विठ्ठल दत्तराव गायकवाड (२५) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विठ्ठलने बीएस्सी (न्यायवैद्यक) या विषयात पदवीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने नोकरीसाठी प्रयत्न चालवले होते. मात्र नोकरी मिळत नसल्याने तो हताश झाला होता.
मराठा आरक्षण असते तर नोकरी लागली असती, असे तो नेहमीच मित्रांना म्हणत होता. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.
तर, अाॅटाेचालक तरुणाने लिंबाच्या झाडाला गमछाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील देवठाणा गावात शनिवारी उघडकीस आली.प्रवीण बाबुराव सोळंके (२२, रा.देवठाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.