लोकसभेचे पहिले अधिवेशन 6 जून पासून

नवी दिल्ली – सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या 6 जून पासून सुरू होत असून ते 15 जून पर्यंत चालणार आहे. तथापी त्याचा अधिकृत कार्यक्रम मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या 31 मे रोजी होणाऱ्या पहिल्या बैठकीत निश्‍चीत केला जाणार आहे. प्राथमिक स्वरूपात तयार करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 6 जून रोजी संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधीत करतील. त्यानंतर लोकसभेच्या हंगामी सभापतींची निवड होईल व तेच नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ देतील.

10 जून रोजी लोकसभेच्या सभापतीपदाची निवड होईल. त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावर सुरू चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना गुरूवारी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनावर शपथ दिली जाणार असल्याचे या आधीच जाहींर करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here