Thalaivar 170 : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रजनीकांत (Rajinikanth) तब्बल 33 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. ‘थलाइवर 170’ असे या सिनेमाचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. तब्बल 33 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चाहते देखील आनंदी आहेत. रविवारी निर्मात्यांनी चित्रपटाचे बीटीएस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रजनीकांत आणि अमिताभ एकत्र असल्याचे दिसते.
‘थलायवर 170’ चित्रपटाचे मुंबईतील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर LYCA प्रॉडक्शन अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन ऑफिसमध्ये खुर्चीवर बसले आहेत आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघत आहेत. तर रजनीकांत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बाजूला उभे आहेत आणि फोनमध्ये बघून हसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी पांढरा शर्ट आणि ग्रे कोट घातला आहे. तर रजनीकांत यांनी ब्राऊन शर्ट घातला असल्याचे दिसत आहे.
When Superstar and Shahenshah met on the sets of #Thalaivar170 🤩
Reunion on screens after 33 years! 🤗 #Thalaivar170 is gonna be double dose of legends! 💥 @rajinikanth @SrBachchan
Done with MUMBAI Schedule 📍📽️✨@tjgnan @LycaProductions #Subaskaran @gkmtamilkumaran… pic.twitter.com/LfyV3rP2JI
— Lyca Productions (@LycaProductions) October 29, 2023
अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा हा फोटो शेअर करत Lyca प्रॉडक्शन यांनी लिहिले आहे की, ‘जेव्हा सुपरस्टार आणि शेहेनशाह ‘थलायवर 170’च्या सेटवर भेटतात! ३३ वर्षानंतर झालेले रियुनियन! ‘थलायवर 170’मध्ये डोस आहे!’ दरम्यान, अमिताभ बच्चन आणि रजनीकांतच्या या जोडीने 1991 मध्ये ‘हम’ या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांनाही एकत्र काम केले नाही. पण आता त्यांच्या ‘थलाइवर 170’ या सिनेमात ते एकत्र झळकणार आहेत.