Tamil Nadu : तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये एका डॉक्टरकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अंकित तिवारी असं या ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने डॉक्टराकडे तब्बल 1 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ईडी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचार प्रकरणी तपास करण्यासाठी येथील दक्षता आणि भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने विभागीय कार्यालयावर पोलिसांसह धाड टाकली.
अंकित तिवारी ईडी अधिकाऱ्यांच्या टीमसोबत अनेक लोकांना धमकावत होता आणि अंमलबजावणी संचालनालयातील केस बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ईडी अधिकारी अंकित तिवारीला डीव्हीएसी कार्यालयातून नेण्यात आले आणि दिंडीगुल येथील न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले,. त्यानंतर त्याला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अंकित तिवारी हा 2016 च्या बॅचचा अधिकारी असून त्याने यापूर्वी गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये काम केले आहे. तो पाच वर्षांहून अधिक काळ ईडीमध्ये काम करत आहे.
#UPDATE | Tamil Nadu Directorate of Vigilance and Anti-Corruption (DVAC) officials leave from the ED sub-zonal office in Madurai after conducting searches here in connection with the case involving ED officer Ankit Tiwari, who was caught red-handed while accepting a bribe of Rs… https://t.co/6Ygz1Vellq pic.twitter.com/nRmpsAye73
— ANI (@ANI) December 2, 2023
अंकित तिवारीला कसे घेतले ताब्यात?
अंकित तिवारी एका कारमधून प्रवास करत होता, त्यावेळी, पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली. अंकित तिवारीला रंगेहाथ अटक करण्यासाठी भ्रष्ट्राचार निर्मूलन पथकाने जाळं टाकलं होतं. स्टेट हायवेवरील एक ड्रॉप ऑफ पाईंटवर अंकित तिवारीने संबंधित प्रकरणातील लाचेचा पहिला हफ्ता म्हणजेच 20 लाख रुपये घेतले. त्याचवेळी, मोठ्या शिताफीने भ्रष्टाचार निर्मून पथकाने घटनास्थळी रेड मारली आणि ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली.