Meloni-Modi Selfie : पंतप्रधान मोदी हे सध्या दुबई दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या काॅप २८ व्या परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. दरम्यान, या परिषदेतील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघांची दुबईमध्ये COP28 संमेलनात भेट झाली. यानंतर मेलोनी यांनी मोदींसोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन मेलोनी यांनी हा फोटो पोस्ट केला. यामध्ये “गुड फ्रेंड्स अॅट COP28” असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.
Good friends at COP28.#Melodi pic.twitter.com/g0W6R0RJJo
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) December 1, 2023
दिल्लीतील G20 परिषदेदरम्यान मेलोनी यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यावेळी सोशल मीडियावर मोदी आणि मेलोनी यांच्या मैत्रीची चर्चा रंगली होती. यानंतर आता मेलोनी यांचा हा सेल्फी व्हायरल होतो आहे.
मेलोनी यांनी आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये #Melodi असा हॅष्टॅग वापरला आहे. हा हॅष्टॅग म्हणजे Meloni मधील ‘Melo’ आणि Modi शब्दातील ‘di’ असा असल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत. त्यामुळे या हॅष्टॅगची सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरू आहे.